Posts

Image
   कोरोनाची काळजी करू नका,कोरोनाला घाबरू नका,     *अवश्य वाचा तुमची कोरोणाची भीती निघून जाईल*                        *।। स्वयं दीप भवो ।।*                         *कोरोना नावाचे भूत* मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. मानवाने त्या सर्वांवर मात करीत आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे. 1918 सालच्या साथीत सुमारे दीड कोटी लोक मेले होते. जगात प्रत्येक वर्षी कोट्यवधी लोक मरतच असतात. मरणाचा रेट तपासला तर एक सेकंद किंवा 1.8 सेकंदाला कुठेतरी कोणीतरी मरत असते. या जगात कोणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. जन्म, जरा, मृत्यू हे महात्मा बुद्धाने सांगितलेले अटळ सत्य आहे. अमेरिकेमध्ये काही महिन्यांपूर्वी 12 ते 25 हजार लोक एन्फ्लुएंजा या आजाराने मृत्यू पडले. गेल्या वर्षी इटलीमध्ये 60 हजार लोक मेले. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशात साथीने, व्हायरल इन्फेक्शनने लाखो लोक मरत असतात. प्रत्येक वर्षी ...
Image
कोण म्हणतंय भिऊ नकोस पाठीशी आहे ?  जरा मागे वळून तरी पहा.आहे का कोण. 😜 अहो एवढ्याशा सर्दी पडशाला मंदिर,दर्गा,चर्च मधे जाणारा मानव आज अवसान गळून बसला आहे.तेहतीस कोटि देवांचा देश खचून गेला आहे.त्यांनी मानलेल्या देवाला म्हणजे त्या मूर्तींना ही आज ठिकठिकाणी 'मास्क' लावण्याचा खेळ सुरू आहे यातच सगळं आलं.'वो सब कुछ देखता है' असे जिथे श्रद्धा ओतली जाते तिथे 'सबुरी'च नसल्यामुळे ते पहायलाही कुणी थांबत नाही.इकडून तिकडून हात मारून कमाईतील टक्केवारी जिथे बिनबोभाट टाकली जाते त्या मंदिरातील हु़ंडीही रिकामी पडत चालल्यामुळे तिथेही आर्थिक मंदीची झळ पोहोचली आहे.बनारसचा बगीचा ओस पडला आहे.जिथल्या जनतेंनी डोक्यावर घेतले त्या जनतेच्या मनातील भीती ही उडवायला नरेंद्र भाई तिथे जायला तयार नाहीत. शैतानाला गाडणारा मदीना, पापांचे क्षालन करणारी व्हॅटिकन सिटी सगळेच ओस पडले आहेत.  भारतात बुवा,महाराज,अम्मा तम्मा, माता,बापू अशा नावांची बिनभांडवली शेती मोठ्या प्रमाणात करणारी मंडळीही आज भूमीगत झाली आहेत. त्या शेताच्या पिकात डोळे मिटून घुसणा-यांची इथे अजिबात कमतरता नाही.उलट असे लबाड लोकंच ...
Image
8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर ,जिल्हा क्रीडा संकुल समिती लातूर व गो स्लिम एरोबिक्स फिटनेस लातूर यांच्या  संयुक्त विध्यमानाने,व्यायामाचा संकल्प करून महिला दिन साजरा करण्यात आला शासन सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी नेहमीच जागरुक असते. शारिरीक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ अशी आरोग्याची नवीन व्याख्या करावी लागेल. आरोग्य म्हणजे केवळ रोगमुक्त असणे असे नव्हे. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक असणे प्रत्येकालाच आवश्यक आहे. यासाठी आरोग्य जागृती महत्त्वाची आहे हे सांगत आरोग्याच्या दृष्टीने गो स्लिम ऐरोबिक्स लातूर ने क्रीडा संकुल येथे आरोग्य शिबीर आयोजित केले होते डॉ.मधुसुदन बियाणी आर्थोपेडिक सर्जन व त्यांच्या टीम कडून अस्थिरोग,हाडांचा ठिसूळपणा BMD मशीनद्वारे उपचार शिबीर यात हाडांची ठिसूळपणाची लक्षणे कोण-कोणती आहेत, त्याचे आपल्या शरीरातील हाडांवर कुठल्या प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात,होऊ नये म्हणून कुठल्या प्रकारची काळजी घेण्यात यावी इ विषयांवर मार्गदर्शन व चेकअप करण्यात आले यात शेकडो च्या वर...
Image
' फाशी ऐवजी युद्धकैद्यांसारखे गोळ्या घालुन उडवा..'    भगतसिंह - राजगुरु - सुखदेव हे हिंदुस्थानच्या गळ्यातले ताईत बनले होते.HSRA च्या या बहाद्दरांनी लढण्याची नवी पद्धत वापरत ब्रिटीशांच्याच न्यायालयात ब्रिटीशांनाच जलील करण्याची पद्धत अवलंबली होती. सरफरोशी की तमन्ना.. वंदे मातरम्.. अशी देशभक्तीची गाणी म्हणत ही लोकं न्यायालयात यायची. यांची गाणी ऐकायला,गुणगुणायला,इन्कलाबचे नारे लावायला जनताही प्रचंड गर्दी करायची. या तिघांनी म्हणावं 'इन्कलाब...' आणि जनतेनं म्हणावं 'जिंदाबाद..' असे काहीसे हे खटले चालत होते. जनतेच्या मनात भगतसिंह - सुखदेव - राजगुरु हे तीन राष्ट्रनायक वाचावेत अशी प्रचंड आशा होती. या खटल्यात भगतसिंहांचे वकील असणार्‍या प्राणनाथ मेहतांना जनतेद्वारा,तरुणांद्वारा विनंती करण्यात आली की त्यांनी या तिघांना दयेच्या अर्जासाठी मनवावं. प्राणनाथांनी हा प्रयोग करुन देखील पाहिला. एके दिवशी मेहता यांना भेटायला गेले. बर्‍याच वेळ या तिघांशी चर्चा केल्यानंतर प्राणनाथ मेहता या तिघांना म्हणाले की तुम्हा तिघांची आयुष्ये ही राष्ट्राची संपत्ती आहे,सर्व जनतेची इच...
Image
भगतसिंग आणि जलियाँवाला बाग हत्याकांडाचे एक संग्रहित चित्र हा लेख सध्या सोशल मीडिया, व्हॉटसअॅपवर फिरतोय. इंग्रजी लेखावरून हा मराठी अनुवाद कुणी केलाय हे कळू शकलेलं नाही. त्यामुळे लेखासोबत अनुवादकाचं नाव देता आलेलं नाही. संबंधितांनी ते कळवल्यास त्याचा नक्की उल्लेख केला जाईल. - संपादक ....................................................................... जलियाँवाला बागेतील १९१९च्या हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारने धर्मांध दंगलींचा खूप प्रचार सुरू केला. त्यामुळे १९२४ला कोहाटमध्ये भयानक हिंदू-मुस्लीम दंगली झाल्या. यानंतरच्या काळात राष्ट्रीय-राजकीय विचारात दंगलीवर प्रदीर्घ चर्चा झाल्या. हे दंगे संपुष्टात आणण्याची गरज सर्वांनाच वाटली; पण काँग्रेस नेत्यांनी हिंदू-मुसलमान नेत्यांमध्ये तह करून त्याद्वारे दंगली थांबवण्याचे प्रयत्न केले. क्रांतिकारी चळवळीने ही समस्या कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी आपले विचार पुढे ठेवले. भगतसिंगांनी या संदर्भात जून १९२८ मध्ये लिहिलेला हा लेख... ...................................................................... भारताची स्थिती आज अत्यंत दयनीय बनली ...
Image
# सौजण्याची_ऐसी_की_तैसी तिच्या 'ती' असण्यानं आणि त्याच्या 'तो' असण्यानं, अभिव्यक्तीचा दर्जा ठरवणाऱ्या इथल्या दर्जाहीन सौजण्याची ऐसी की तैशी... रडण्यासाठी खांदा देऊन, डोळे पुसण्याआधी तिच्या कंबरेत हात घालून, मनातल्या मनात दात इचकत उफाळून आलेल्या गुदगुदनाऱ्या इथल्या हार्मोन्स बाधित सौजण्याची ऐसी की तैसी... मदतीच्या खांद्यावरून, उपकाराच्या बोटाला धरून, अहंकाराच्या दारातून विश्वासाच्या घरातून मी नाही त्यातली कडी लाव आतली म्हणणाऱ्या... इथल्या पलंगउत्सुक सौजण्याची ऐसी की तैसी.... नजरेस नजर देताना, क्रमाक्रमाने खाली सरकत... निर्लज्जपनाच्या आडून वासनेचा दारावर, दस्तक देण्याची हरकत करणाऱ्या... इथल्या वासनांध सौजण्याची ऐसी की तैसी.... गर्दीचा फायदा उचलून.. मांसल भागावर टच करून, सॉरी 'ताई' म्हणत दुनियाभरच्या सज्जनतेचा आव आणून, मनातल्या मनात लाळ गाळणाऱ्या.. इथल्या कुत्राळलेल्या सौजण्याची ऐसी की तैसी.... संभोगाच्या रोगीट औलादिंना सोबत घेऊन जनावरांशी साटं-लोटं..करून अकृत्रिम प्रणयातून... मानवी वृत्तीला हेपलणाऱ्या इथल्या प्रयोगशील सौजण्...