#सौजण्याची_ऐसी_की_तैसी
तिच्या 'ती' असण्यानं
आणि त्याच्या 'तो' असण्यानं,
अभिव्यक्तीचा दर्जा ठरवणाऱ्या
इथल्या दर्जाहीन सौजण्याची ऐसी की तैशी...
रडण्यासाठी खांदा देऊन,
डोळे पुसण्याआधी तिच्या कंबरेत हात घालून,
मनातल्या मनात दात इचकत
उफाळून आलेल्या गुदगुदनाऱ्या
इथल्या हार्मोन्स बाधित सौजण्याची ऐसी की तैसी...
मदतीच्या खांद्यावरून,
उपकाराच्या बोटाला धरून,
अहंकाराच्या दारातून
विश्वासाच्या घरातून
मी नाही त्यातली कडी लाव आतली म्हणणाऱ्या...
इथल्या पलंगउत्सुक सौजण्याची ऐसी की तैसी....
नजरेस नजर देताना,
क्रमाक्रमाने खाली सरकत...
निर्लज्जपनाच्या आडून
वासनेचा दारावर,
दस्तक देण्याची हरकत करणाऱ्या...
इथल्या वासनांध सौजण्याची ऐसी की तैसी....
गर्दीचा फायदा उचलून..
मांसल भागावर टच करून,
सॉरी 'ताई' म्हणत
दुनियाभरच्या सज्जनतेचा आव आणून,
मनातल्या मनात लाळ गाळणाऱ्या..
इथल्या कुत्राळलेल्या सौजण्याची ऐसी की तैसी....
संभोगाच्या रोगीट औलादिंना सोबत घेऊन
जनावरांशी साटं-लोटं..करून
अकृत्रिम प्रणयातून...
मानवी वृत्तीला हेपलणाऱ्या
इथल्या प्रयोगशील सौजण्याची ऐसी की तैसी...
विकल्याने लाफाट झालेल्या उघड्या देहाला
बोथट संवेदनांच्या गोधडीने
झाकण्याचा बालिश प्रयत्न करणाऱ्या
मान्यताप्राप्त संस्थांच्या
इथल्या सोज्वळ सौजण्याची ऐसी की तैसी...
पद प्रतिष्ठेच्या आडून,
मजबुरीवर निशाणा साधणाऱ्या,
भुक्काड मेंदूच्या,निर्लज्ज,
बाजारबूनग्या संस्कृती रक्षकांच्या...
मानवतेच्या रक्ताने बरबटलेल्या..
इथल्या राक्षसी सौजण्याची ऐसी की तैसी....
देखणीसाठी लेखणीला
शृंगारिक झोपाळ्यावर जुलवत,
मादकतेचं मूळव्याध शेकणाऱ्या,
झिंगाटलेल्या प्रतिभावंतांच्या फुदफूदणाऱ्या
इथल्या लिंग पिसाट सौजण्याची ऐसी की तैसी...
जर लिहिता आला नाही,
आतल्या आत..काळोखात..
दबलेल्या,गुदमरलेल्या
हुंदक्यांचा आक्रोश...
तर...तर
माझ्यातील चमडी बचाव लेखणी असणाऱ्या
प्रसिद्ध कवीच्या सौजण्याची ऐसी की तैसी....
सुमित गुणवंत
95 03 06 05 48

Comments
Post a Comment