कोण म्हणतंय भिऊ नकोस पाठीशी आहे ? जरा मागे वळून तरी पहा.आहे का कोण. 😜 अहो एवढ्याशा सर्दी पडशाला मंदिर,दर्गा,चर्च मधे जाणारा मानव आज अवसान गळून बसला आहे.तेहतीस कोटि देवांचा देश खचून गेला आहे.त्यांनी मानलेल्या देवाला म्हणजे त्या मूर्तींना ही आज ठिकठिकाणी 'मास्क' लावण्याचा खेळ सुरू आहे यातच सगळं आलं.'वो सब कुछ देखता है' असे जिथे श्रद्धा ओतली जाते तिथे 'सबुरी'च नसल्यामुळे ते पहायलाही कुणी थांबत नाही.इकडून तिकडून हात मारून कमाईतील टक्केवारी जिथे बिनबोभाट टाकली जाते त्या मंदिरातील हु़ंडीही रिकामी पडत चालल्यामुळे तिथेही आर्थिक मंदीची झळ पोहोचली आहे.बनारसचा बगीचा ओस पडला आहे.जिथल्या जनतेंनी डोक्यावर घेतले त्या जनतेच्या मनातील भीती ही उडवायला नरेंद्र भाई तिथे जायला तयार नाहीत. शैतानाला गाडणारा मदीना, पापांचे क्षालन करणारी व्हॅटिकन सिटी सगळेच ओस पडले आहेत. भारतात बुवा,महाराज,अम्मा तम्मा, माता,बापू अशा नावांची बिनभांडवली शेती मोठ्या प्रमाणात करणारी मंडळीही आज भूमीगत झाली आहेत. त्या शेताच्या पिकात डोळे मिटून घुसणा-यांची इथे अजिबात कमतरता नाही.उलट असे लबाड लोकंच ...